Home महाराष्ट्र सांगलीत मनसेच्या आंदोलनाला यश; छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या कर्मचाऱ्याने मागितली महाराष्ट्राची...

सांगलीत मनसेच्या आंदोलनाला यश; छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या कर्मचाऱ्याने मागितली महाराष्ट्राची माफी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या बजाज फायनान्स कंपनीच्या त्या कर्मचाऱ्याने अखेर संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागत आपल्याकडून झालेल्या प्रकारावर खेद व्यक्त केला आहे.

बजाज फायनान्सने वसुलीसाठी नेमलेल्या दिल्लीमधील बाबा हरिदास कम्युनिकेशन एजन्सीचा हा कर्मचारी होता. मनसेने याप्रकरणी सांगलीतील बजाज फायनान्सच्या कार्यालयाला टाळे ठोकले होते.

हे ही  वाचा : मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांच्या मुलाला अज्ञात व्यक्तीकडून धमकी; भारती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

बजाज फायनान्सने या आंदोलनाची तत्काळ दखल घेत बाबा हरिदास कम्युनिकेशनच्या त्या कर्मचाऱ्याला तंबी देत माफी मागण्यास सांगितले आणि कंत्राटही रद्द करून टाकले.

दरम्यान, एजन्सीच्या कर्मचाऱ्याने सांगलीतील एका कर्जदाराशी फोनवर बोलताना छत्रपती पैसे सोडून गेला होता का ? शिवाजी आता पैसे भरणार का ? अशी भाषा वापरत छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केला होता. तसेच महिलांविषयी अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती. या प्रकरणाची मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी गंभीर दखल घेऊन सांगलीतील जिल्हा परिषदेसमोरील बजाज फायनान्सच्या कार्यालयाला टाळे ठोकले होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

सदाभाऊ, आधी हाॅटेलची उधारी द्या, मग पुढे जावा; सांगोलात हाॅटेल चालकानं सदाभाऊंचा ताफा अडवला

“काँग्रेसची मोठी खेळी; ‘या’ विधानपरिषद निवडणूकीत भाजपला दिला पराभवाचा धक्का”

“…मग 2 वर्ष काय फक्त टोमण्यांमध्ये गेले का?”; मनसेचा सवाल