महाराष्ट्रात जरा काय घडलं की राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे कुठे आहेत?- अमोल कोल्हे

0
209

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी उत्तर प्रदेशमधील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना भेट देण्यास निघाले होते. मात्र युपी पोलिसांनी त्यांना अडवत धक्काबुक्की करत अटक केली आहे. यावर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही घटना लोकशाहीवर घाला घालणारी असून उत्तर प्रदेश सरकारची दडपशाही आहे., अशी टीका अमोल कोल्हे यांनी केली आहे. एखाद्या कुटुंबांत दुदैवी घटना घडल्यानंतर त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी समाज पुढे येत असतो. मात्र, उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेनंतर या ठिकाणी कुटुंबियांना भेटण्यापासून मज्जाव केला जातो. हि निंदनीय बाब असून नेहमी प्रत्येक गोष्टीवर बोलणारे भाजपचे नेते आता का गप्प आहेत, असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात जरा काय घडलं की राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करणारे उत्तर प्रदेशातील घटनांच्या वेळी कुठे जातात, असा प्रश्नही अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भाजप म्हणजे नवी ईस्ट इंडिया कंपनीच; अशोक चव्हाण यांची भाजपवर टीका

दोषींना ‘अशी’ शिक्षा केली जाईल की…; हाथरस प्रकरणावर योगी आदित्यनाथांनी सोडलं मौन

राहुल गांधी यांना धक्काबुक्की कोण करणार नाही, त्यांचा तोल गेला असावा- रावसाहेब दानवे

“भाजप सरकार सत्तेच्या मस्तीत, ते कधी कोसळतील हे त्यांनाही कळणार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here