Home देश …त्यादिवशी नेमकं काय घडलं?; मणिपूरमधील पिडीत महिलेनं सांगितला घटनाक्रम, म्हणाली, पोलिसांनीच आम्हांला…

…त्यादिवशी नेमकं काय घडलं?; मणिपूरमधील पिडीत महिलेनं सांगितला घटनाक्रम, म्हणाली, पोलिसांनीच आम्हांला…

1532

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मणिपूर : मणिपूरमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. दोन महिलांना, जमावाने नग्न करत धिंड काढली आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आज, या 2 पीडितेपैकी एका महिलेने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या प्रतिक्रियेत नेमकं काय घ़डलं, ते सांगितलं.

यात तिने पोलिसांनीच आम्हाला जमावाच्या ताब्यात दिल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. या पिडितांचं वय 20 वर्षै आणि 40 वर्ष आहे.

ही बातमी पण वाचा : किरीट सोमय्यांच्या व्हिडीओवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “मी असे किळसवाणे आणि…”

पिडिताने दिलेल्या माहितीनुसार,  जमावाने त्यांच्या गावावर हल्ला केल्यानंतर आसरा घेण्यासाठी त्या जंगलाकडे पळाल्या. यानंतर थौबाल पोलिसांनी या महिलांची सुटका केली आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले. मात्र, पोलीस स्टेशनपासून २ किलोमीटर अंतरावर असतानाच जमावाने त्यांना थांबवलं.

जमाव त्यांच्या गावावर हल्ला करत होता तेव्हा पोलीसही हजर होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना तेथून सोबत घेतलं. काही अंतरावर गेल्यावर पोलिसांनी महिलांना रस्त्यावर जमावाबरोबर सोडून दिलं. त्यांना, पोलिसांनीच जमावाच्या हवाली केलं. इतकंच नव्हे, तर जमावाने पीडित महिलेचे वडील आणि भाऊ यांची कथितपणे हत्या केली., असा धक्कादायक खुलासा या पिडीतेनं यावेळी केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

“पुन्हा राजकीय भूकंप?; मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या शिंदे गटाची ‘या’ आमदाराची, मिलिंद नार्वेकरांशी भेट, चर्चांना उधाण”

“बंडानंतर, पहिल्यांदाच, उद्धव ठाकरेंनी, घेतली अजित पवारांची भेट, चर्चांना उधाण”

किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडिओची, महिला आयोगाकडून दखल, रूपाली चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…