Home महाराष्ट्र दरडीचा अंदाज येत नसेल तर…; राज ठाकरे यांची शिंदे सरकारवर टीका

दरडीचा अंदाज येत नसेल तर…; राज ठाकरे यांची शिंदे सरकारवर टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना घडली. याघटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त करत राज्य सरकारला फटकारले आहे.

खरंतर अशा घटना घडल्यावर लगेच हे बोलायची इच्छा नव्हती, पण आत्ता इतकंच सांगतो की, कुठे दरड कोसळू शकतात याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन?;असो. पुढे यवर सविस्तर बोलेन पण आतातरी सगळे सुखरूप राहावेत हीच इच्छा, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : …त्यादिवशी नेमकं काय घडलं?; मणिपूरमधील पिडीत महिलेनं सांगितला घटनाक्रम, म्हणाली, पोलिसांनीच आम्हांला…

इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे असं सांगण्यात येत आहे. यातून लोकं सुखरूप बाहेर पडावीत इतकी इच्छा. जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्याकडून काय मदत मिळेल हे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जरूर पाहावं, अशा सूचना राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केल्या आहेत.

दरम्यान, खालापूरच्या इर्शाळवाडीत काल रात्री दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 12 जण ठार झाले आहेत. तर 34 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. 15 तास उलटून गेले तरी अजूनही 150 लोक बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचा शर्थीचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, या लोकांचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. एक तर मुसळधार पाऊस, निसरडा रस्ता असल्याने घटनास्थळी वाहन नेता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी जेसीबी पोहोचू शकली नसल्याने कोणतंही मदतकार्य करता येत नाहीये. परिणामी कुदळ आणि फावडे घेऊन मदतकार्य करावे लागत आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

किरीट सोमय्यांच्या व्हिडीओवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “मी असे किळसवाणे आणि…”

“पुन्हा राजकीय भूकंप?; मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या शिंदे गटाची ‘या’ आमदाराची, मिलिंद नार्वेकरांशी भेट, चर्चांना उधाण”

“बंडानंतर, पहिल्यांदाच, उद्धव ठाकरेंनी, घेतली अजित पवारांची भेट, चर्चांना उधाण”