कल्याण! बाळ नाल्यात पडलं, त्यावेळी नेमकं काय घडलं?; बाळाच्या आजोबांनी सांगितला सविस्तर घटनाक्रम, म्हणाले…

0
453

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

कल्याण : गेल्या काही दिवसात पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली आहे. जोरदार पावसात मध्य रेल्वेची रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. मात्र आता हाच रेल्वे प्रवास कल्याणमधील कुटुंबासाठी दुर्दैवी ठरला.

2 दिवसांपूर्वी कल्याण पत्रीपूल भागात रेल्वे खोळंबल्याने बाळाच्या आईसह आजोबांनी रुळावरून चालत जात प्रवास करत होते. मात्र त्यावेळी भलतंच घडलं. रेल्वे ट्रॅकवरील एक नाला पार करताना आजोबांच्या हातून बाळ निसटलं आणि थेट नाल्यात पडलं. याचा व्हिडिओदेखील सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेनंतर बाळाच्या आजोबांनी घटनेनंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्या दिवशी नेमकं काय घडलं?, याबाबत आजोबांनी सविस्तर सांगितलं.

ही बातमी पण वाचा : अजित दादा महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार?; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले…

आम्हाला कोपरला उतरायचं होतं. पण लोकल कल्याण स्थानकाजवळ थांबली. आम्ही 12 वाजता निघालो होतो, पण ट्रेन काही तास डोंबिवली कल्याण खाडीवर थांबून होती. आम्ही कल्याण स्टेशनवर चालत जाण्याचा निर्णय घेतला. ट्रेनमधून उतरल्यानंतर पहिल्यांदा मुलगी योगिता घसरून पडली. मी तिला कसं बसं उचललं आणि तिच्याकडचं बाळ माझ्याकडे घेतलं. तसेच पुढे चालू लागलो. वाटेवरून जाताना पाय घसरत होता. त्यात मी रेनकोट घातला होता. पाय घसरला आणि सावरताना बाळ हातून नाल्यात पडलं, असं बाळाच्या आजोबांनी सांगितलं.

बाळाला गेल्या सहा महिन्यापासून आम्ही तपासणीसाठी वाडिया रुग्णालयात घेऊन जात होतो. त्या दिवशी नेमकी तपासणीची तारीख मिळाली. त्यासाठी आम्ही घरातून निघालो. ट्रेन कल्याण डोंबिवली दरम्यान खूप वेळ थांबली होती आणि लोकं उतरून पुढे जात होते. आम्हीही तसंच ठरवलं. भिवंडीत जर आरोग्य सुविधी व्यवस्थित असत्या तर आज अशी वेळ आली नसती., असंही आजोबांनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! टोलनाका तोडफोड प्रकरणी पोलिसांची मोठी

“अजित पवार गटाने सरकारला पाठिंबा दिला नसता, तर…”; ठाकरे गटाच्या नेत्याचं थेट विधान

“अभिनेते किरण माने यांच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष, म्हणाले, सेक्सची भूक ही…”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here