मुंबई : राज्यात कोरोनानं थैमान घातलं असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. राज्याने दुसऱ्यांदा बरे झालेल्या रुग्णांचा विक्रमी उच्चांक गाठला आणि कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
वेल डन महाराष्ट्र. आज एकाच दिवशी 5071 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. 4242 रुग्ण मुंबई शहर व उपनगरातील आहेत. आतापर्यंत 56 हजार 49 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. फक्त आणि फक्त राज्यातील जनतेच्या संयमामुळे, प्रशासनावरील विश्वासामुळे हे शक्य झाले आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
वेल डन महाराष्ट्र !
आज एकाच दिवशी ५०७१ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला.४२४२ रुग्ण मुंबई शहर व उपनगरातील आहेत.आतापर्यंत ५६ हजार ४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.फक्त आणि फक्त राज्यातील जनतेच्या संयमामुळे, प्रशासनावरील विश्वासामुळे हे शक्य झाले आहेhttps://t.co/9DDSZrydfb
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) June 15, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर, आधी पेशंटच्या खाटाचा बघा?”
सामना अग्रलेखातून केलेल्या टीकेवर बाळासाहेब थोरातांचा पलटवार; म्हणाले…
“मी असताना कुणीही आरक्षण हटवू शकत नाही”- रामदास आठवले
मुंबईतील 950 हून अधिक कोरोना मृत्यू का लपवण्यात आले?; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल