Home महाराष्ट्र मुंबईतील 950 हून अधिक कोरोना मृत्यू का लपवण्यात आले?; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना...

मुंबईतील 950 हून अधिक कोरोना मृत्यू का लपवण्यात आले?; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई : मुंबईतील 950 हून अधिक कोरोना मृत्यू का लपवण्यात आले? इतके अक्षम्य दुर्लक्ष का? आणि असं करणार्‍यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार?, असे सवाल उपस्थित करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहलं आहे.

कोरोना बळी न दाखवता ते लपवून ठेवणे ही एक अतिशय गंभीर बाब आहे. मुंबईच्या दृष्टीने विचार केला तर हा संपूर्ण प्रकार अतिशय जीवघेणा आणि अतिशय धोकादायक आहे,  असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील कोरोना रुग्णांच्या मृत्यूबाबत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

पारदर्शकता हा एकाच मार्गाद्वारे लोकांना सजक करता येऊ शकतं. कोरोनासंदर्भातील संपुर्ण माहिती योग्य प्रकारे पोहचली तरच ते योग्य काळजी घेऊ शकतात, मात्र मुंबईत कोरोनामुळे झालेल्या तब्बल 950 मृत्यू हे कोरोना मृत्यू म्हणून दाखवण्यात आले नाहीत. यामुळे मुंबईतील कोरोनाची दाहकता या यामुळे अधिक स्पष्ट होते. असा गैरप्रकार करणाऱ्यांवर आपण कारवाई करावी, अशी मागणीही फडणवीसांनी पत्रात केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूवर कंगना रणौतची प्रतिक्रिया; म्हणाली…

अज्ञानापेक्षा धोकादायक एकमेव गोष्ट म्हणजे अहंकार; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

काँग्रेस नेते आणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर अतुल भातखळकरांचा टोला ; म्हणाले…

“मुख्यमंत्र्यांकडून शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास परवानगी, शिक्षण विभागाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय”