Home मुंबई “मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार जे काही करेल त्याला आमचा पाठिंबा असेल”

“मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार जे काही करेल त्याला आमचा पाठिंबा असेल”

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती दिली. याचपार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली

आम्ही सरकारसोबत आहोत, मराठा समाजाचं जे काही आरक्षण आहे, ते बहाल करण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी सरकार करेल त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा असेल. यामध्ये कुठलंही राजकारण आणणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे

दरम्यान, सरकार कुठं चुकत असेल तर जरुर सरकारला सांगू. पण सरकारला या संदर्भात पाठिंबा देऊ. तात्काळ या संदर्भातील कायदेशीर निर्णय केले पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण”

मराठा आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्व छत्रपती संभाजीराजेंनी करावं; शिवसेनेच्या ‘या’ खासदाराची मागणी

“कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्र सरकार दोघांनी मिळून अनुदान दिलं पाहिजे”

“माजी खासदार राजू शेट्टी यांची कोरोनावर मात”