Home महाराष्ट्र “कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्र सरकार दोघांनी मिळून अनुदान दिलं पाहिजे”

“कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्र सरकार दोघांनी मिळून अनुदान दिलं पाहिजे”

कोल्हापूर : केंद्र सरकारने सोमवारी अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केला. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासन व केंद्र शासन या दोघांनी मिळून हे अनुदान दिले पाहिजे, अशी मागणी केली. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

कांदा निर्यात पूर्ण बंद करण्याचे धोरण योग्य नाही. याबाबत केंद्र शासनाशी संपर्क साधला आहे. मात्र, निर्यात बंद करायची झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना जे नुकसान होणार आहे, त्याच्या फरकाची रक्कम मिळेल, अशी व्यवस्था झाली पाहिजे. यासाठी राज्य शासन व केंद्र शासन या दोघांनी मिळून अनुदान दिले पाहिजे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यंदा निर्यात अधिक झाली आहे. त्यामुळे कांदा बाजारात कमी येऊन ग्राहकांना अधिक दराने तो खरेदी करावा लागला असता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“माजी खासदार राजू शेट्टी यांची कोरोनावर मात”

……म्हणून आयपीएलमध्ये नंबर वन आहे बुमराह; ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ वेगवान गोलंदाजाचं मत

मराठा आरक्षणाच्या लढाईचे नेतृत्व उदयनराजे भोसले यांनी करावी; ‘या’ नेत्याने केली मागणी

जनतेच्या पैशातून ‘वाय प्लस’ सुरक्षा कशासाठी?; उर्मिला मातोंडकरांचा केंद्राला सवाल