Home देश 80 वर्षाचे शरद पवार बाहेर फिरतात तर मग…; नवनीत राणांची मुख्यमंत्र्यांवर टीका

80 वर्षाचे शरद पवार बाहेर फिरतात तर मग…; नवनीत राणांची मुख्यमंत्र्यांवर टीका

दिल्ली : पावसाळी अधिवेशनानिमित्त राजधानी दिल्लीत असलेल्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

80 वर्षाचे शरद पवार बाहेर फिरतात मग मुख्यमंत्री घरात का बसलेत?, असा सवाल करत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करत राज्याचा ताबा आता केंद्राने घ्यायला हवा. राज्यातील परिस्थिती गंभीर झाली आहे तरीही मुख्यमंत्री मात्र आपल्या निवासस्थानात बसून आहेत ते मातोश्रीच्या बाहेर पडत नाहीत, असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी घराबाहेर पडत नाहीत, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावर नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांचे आणि पंतप्रधानांचे प्रोटोकॉल वेगवेगळे असल्याचं म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण”

“केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण”

मराठा आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्व छत्रपती संभाजीराजेंनी करावं; शिवसेनेच्या ‘या’ खासदाराची मागणी

“कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्र सरकार दोघांनी मिळून अनुदान दिलं पाहिजे”