आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसे भाजप विरूद्ध शिवसेना यांच्यात जोरदार राजकारण सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 5 जूनला अयोध्येला जाणार आहेत. मात्र राज ठाकरे यांच्या दाैऱ्याआधी शिवसेना नेते व मंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्या दाैऱ्यावर जाणार आहेत. यावरून आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पाहू, कोण असली कोण नसली? हिंदुत्वाचा खरा वारसदार कोण, हे लवकरच कळेल. त्यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्यावाचून पर्याय नाही, असा टोला बाळा नांदगावकरांनी यावेळी लगावला.
हे ही वाचा : “प्राण जाये पर वचन न जाए, हे आमचं हिंदुत्व, आम्हांला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही”
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अयोध्या दाैऱ्याशी संबंधित मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत नांदगावकर बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
“प्राण जाये पर वचन न जाए, हे आमचं हिंदुत्व, आम्हांला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही”
भाजपा खासदाराची राज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हणत टीका; आता मनसेकडून प्रतिक्रिया, म्हणाले…
“भाजपमध्ये पक्षप्रवेशाची लाट; तब्बल ‘इतक्या’ डाॅक्टर्संनी हाती घेतला भाजपचा झेंडा”