आम्हीच आता शिवसेनेचा कोथळा बाहेर काढू; रावसाहेब दानवेंचा जोरदार हल्लाबोल

0
557

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी बोलताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.

लग्न आमच्यात ठरलं होतं, हे पळून गेले आणि दुसऱ्याची लग्न लावलं. आता आम्हीच शिवसेनेचा कोथळा काढू, असा जोरदार घणाघात रावसाहेब दानवेंनी यावेळी केला.

हे ही वाचा : गोपीनाथ मुंडे आज महाराष्ट्रात असते तर…; एकनाथ खडसेंनी काढली गोपीनाथ मुंडेंची आठवण

लग्न आमच्यात ठरलं होतं, हे पळून गेले आणि दुसऱ्याची लग्न लावलं. ज्यांनी मतं दिली त्यांनी भाजप-शिवसेनेला मतदान केलं. ज्याला मतं दिलं त्याच्यासोबतची युती तोडून टाकली. स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी युती तोडली. यांच्या एका मुख्यमंत्रीपदासाठी सर्व आमदार-खासदार नाराज आहेत. त्यामुळे जनता निर्णय करेल. हे काय कोथळा काढतात, निवडणुकीत आम्हीच शिवसेनेचा कोथळा काढू., असा हल्लाबोल रावसाहेब दानवेंनी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“…या कारणासाठी सांगलीत शिवसेना-राष्ट्रवादीचा वाद चव्हाट्यावर”

उद्धव ठाकरेंना आवाहन देणाऱ्या खासदार नवनीत राणांना, गुलाबराव पाटलांचं जोरदार उत्तर, म्हणाले…

“मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय चर्चांना उधाण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here