Home महाराष्ट्र “कुणालाही पाठीशी घालणार नाही, दोषीला कठोर शिक्षा देऊ”

“कुणालाही पाठीशी घालणार नाही, दोषीला कठोर शिक्षा देऊ”

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण आणि संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्विकारल्याची माहिती दिली.

‘सरकार चालवताना आमची जबाबदारी असते की न्यायाने वागणे. गेल्या काही महिन्यात गलिच्छ राजकारण सुरु. तपास निपक्षपातीपणे झाला पाहिजे. पण एखाद्याला आयुष्यातून उठवायचं म्हणून तपास होता कामा नये. गेल्या काही दिवसांपासून आम्ही म्हणू तिच पूर्व दिशा असल्याचं विरोधकांना वाटतं’, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

‘प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात. तुम्ही म्हणत असाल की इतके दिवस का लावले. गुन्हा दाखल करुन मोकळं होणं याला न्याय म्हणत नाहीत. ज्या वेळी घटना कळली. त्यावेळीच तपासाचा निर्णय झाला. पोलिसांना तसा आदेश दिला. तपासातून सत्य बाहेर येईल तेव्हा कुणालाही पाठीशी घालणार नाही. दोषीला कठोर शिक्षा देऊ’, असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

“विरोधी पक्षांनी अतिशय घाणेरडं राजकारण केलंय, या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी”

“जे धाडस उद्धव ठाकरेंनी दाखवलं, तेच शरद पवारांनी दाखवावं; धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा”

आता संजय राठोड यांना अटक करा; राजीनाम्या नंतर अतुल भातखळकरांची मागणी

मोठी बातमी! अखेर संजय राठोड यांनी दिला राजीनामा