Home महाराष्ट्र “विरोधी पक्षांनी अतिशय घाणेरडं राजकारण केलंय, या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी”

“विरोधी पक्षांनी अतिशय घाणेरडं राजकारण केलंय, या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी”

मुंबई :  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सध्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. संजय राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी ते बोलत होते.

“मी माझा राजीनामा मा. मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे. आमच्या बंजारा समाजाची तरुणी पूजा चव्हाणचा मृत्यू झाला. मात्र अनेक दिवसांपासून  विरोधी पक्षांनी प्रसारमाध्यम, समाज माध्यमातून घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मीडियातून माझ्या समाजाची, माझी वैयक्तिक  बदनामी करण्याचा प्रयत्न केलाय, अस संजय राठोड म्हणाले आहेत.

मला राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रकार घडला. गेली तीस वर्ष मी केलेलं राजकीय आणि सामाजिक काम उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी, हीच माझी मागणी आहे. याचा तपास व्हावा, मी बाजूला राहून चौकशी व्हावी, सत्य बाहेर यावं, ही माझी भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांना हे सांगून मी राजीनामा दिला” असं संजय राठोड यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“जे धाडस उद्धव ठाकरेंनी दाखवलं, तेच शरद पवारांनी दाखवावं; धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा”

आता संजय राठोड यांना अटक करा; राजीनाम्या नंतर अतुल भातखळकरांची मागणी

मोठी बातमी! अखेर संजय राठोड यांनी दिला राजीनामा

“आपण भाजपात गेला नसता तर फडणवीसांनी तेंव्हाच गुन्हा दाखल केला असता”