“जे धाडस उद्धव ठाकरेंनी दाखवलं, तेच शरद पवारांनी दाखवावं; धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा”

0
196

मुंबई :  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सध्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. राठोडांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देत राष्ट्रवा अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय.

जे साहस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवलं आहे. तेच साहस आता शरद पवार यांनाही धनंजय मुंडे यांच्या मुद्द्यावर दाखवलं पाहिजे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आधीच राठोड यांचा राजीनामा घ्यायला हवा होता. ते प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारस आहेत. त्यानुसार आधीच ठाकरी बाणा दाखवायला हवा होता, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

आता संजय राठोड यांना अटक करा; राजीनाम्या नंतर अतुल भातखळकरांची मागणी

मोठी बातमी! अखेर संजय राठोड यांनी दिला राजीनामा

“आपण भाजपात गेला नसता तर फडणवीसांनी तेंव्हाच गुन्हा दाखल केला असता”

उद्धवजींना मी इशारा देतो, की जर…; चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here