Home महाराष्ट्र उद्धवजींना मी इशारा देतो, की जर…; चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान

उद्धवजींना मी इशारा देतो, की जर…; चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान

मुंबई : भाजपनं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून सरकारला आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेरण्याची पूर्ण तयारी केली असून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान दिलं आहे.

सोमवारपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. सोमवारच्या आत जर राज्य सरकारनं संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही, त्यांची चौकशी सुरू केली नाही आणि मुख्यमंत्र्यांनी यावर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवेदन करावं, नाहीतर आम्ही या मुद्द्यावर तोंड न उघडणाऱ्या राज्य सरकारला अधिवेशनात तोंड उघडू देणार नाही, सभागृह चालू देणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटलांनी यावेळी दिला.

दरम्यान, चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“महाराष्ट्रात पुन्हा लाॅकडाऊन होणार नाही”

“साहेब ही खुर्ची इतकी वाईट आहे का, की या खुर्चीपुढे बाईची इज्जत राहिली नाही”

टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूची चाैथ्या कसोटीतून माघार; BCCI ने दिली माहिती

“ही चित्रा वाघच तुम्हांला पुरुन उरेन”