आम्हा राजकारण्यांमध्ये माणुसकी उरली नाही; सोनू सूदसाठी भाजपा प्रवक्त्याचं भावनिक पत्र

0
178

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या ‘सामनाच्या अग्रलेखातून सोनूच्या सूदच्या या बचावकार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.  याच पार्श्वभूमीवर भाजपा प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी सोनू सूदला पत्र लिहित माफी मागितली आहे.

मला माफ कर कारण मीसुद्धा या राजकीय व्यवस्थेचा एक भाग आहे. ही व्यवस्था प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करते. चांगल्या गोष्टीतही वाईट बघण्याची ही वृत्ती आहे. मला आठवतंय, स्थलांतरितांच्या वेदनांबद्दल तू बोलत होतास. भुकेल्या मुलाला कडेकर उचलून मैलोनमैल चालणाऱ्या माऊलीला पाहून तुझे डोळे पाणवले होते. मला माफ कर, आम्हा राजकारण्यांमध्ये माणुसकी उरली नाही, असं या पत्रामध्ये लिहिलं आहे.

एक व्यक्ती बदल घडवून आणू शकतो हे तू सिद्ध केलंस आणि ते बदल घडवण्यासाठी त्या व्यक्तीला मुख्यमंत्री असण्याची गरज नाही. तुझ्यासारखे लोक देशाला प्राधान्य देतात. तू खरा हिरो आहेस, असंही श्वेता शालिनी यांनी पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, या पत्रावर सोनू सूदनेही प्रतिक्रिया दिली. आज वाचलेली ही सर्वांत सुंदर गोष्ट आहे. थेट तुमच्या मनातून भावना यात व्यक्त केल्या आहेत. धन्यवाद असं ट्विट त्याने केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“पुढच्या 48 तासात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज”

अखेर सोनु सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रयांचा पत्ता सापडला- संजय राऊत

संजय राऊत यांच्या टीकेनंतर सोनू सूद ‘मातोश्री’ वर

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं सोनू सूदचं कौतुक, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here