आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नंदुरबार : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. अशातच शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेना-भाजप युतीबद्दल मोठं विधान केलं आहे.
आमचं ठरलंय, भाजपसोबत जाणार नाही, असं विधान चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केलं. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपसोबत जायचे नाही, असे स्पष्ट आदेश वरिष्ठांनी दिल्याचं चंद्रकांत रघुवंशी यांनी म्हटलं.
हे ही वाचा : पालघर निवडणुकीसाठी राज ठाकरेंचा ‘हा’ शिलेदार मैदानात?; मनसेची मोर्चेबांधणीला सुरूवात
धुळे, नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माघारीनंतरच चित्र स्पष्ट होईल. सन्मानाने सर्वपक्षीय पॅनल तयार झाल्यास निवडणूक लढण्यास हरकत नाही, असं रघुवंशी यांनी म्हटलं. तसेच महाविकास आघाडी झाली, तर त्याच माध्यमातून निवडणूक लढविली जाईल. तसेच काँग्रेस हा महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहे, असंही रघुवंशी यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
महाविकास आघाडीसोबत गेल्याचा आता पश्चाताप होतोय; राजू शेट्टींचं मोठ वक्तव्य
अजित पवारांना ईडीच्या छाप्यांनी फारसा फरक पडणार नाही- रामदास आठवले