अरुण राठोडला आम्ही ओळखत नाही; पूजाच्या आईचा ‘मोठा’ खुलासा

0
212

बीड :  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहेत. आता पूजाची आईने अरुण राठोडला आम्ही ओळखत नाही. आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू, असं म्हटलं आहे. त्या टीव्ही 9 मराठीशी बोलत होत्या.

माझ्या मुलीचा मृत्यू झालाय, तिची बदनामी करू नये, माझी मुलगी कशी होती मला माहीत आहे. ती खूप टेन्शनमध्ये होती, तिने आत्महत्या का केली याबद्दल काहीच माहीत नाही. मला आणखी पाच मुली आहेत, आम्ही सगळेच आत्महत्या करणार आहोत, असं पूजाची आई म्हणल्या आहेत.

अरुण राठोडला आम्ही ओळखत नाही. फक्त नावच ऐकलं आहे. पूजाने आम्हाला काहीच सांगितलं नाही. दोन ते चार दिवसांत येते आणि भेटून जाते, असं तिने सांगितलं. बाकी काहीच बोलली नाही, असं पूजाच्या आईने सांगितलं आहे.

ती आमच्यासाठी मुलासारखीच होती. सर्व तिला राखी बांधत होते. सर्वांची काळजी घ्या असं ती नेहमी सांगायची. आम्हाला काहीच माहीत नाही, उगाच काही तरी बदनामी करायची, त्यांना काही मुलीबाळी नाहीत काय?, असंही पूजाच्या आईने म्हटलंय.

महत्वाच्या घडामोडी –

मुख्यमंत्री साहेब, नक्षलवादी होण्याची परवानगी द्या; शेतकऱ्याचं मन हेलावून टाकणारं पत्र

“भारताचा स्टार गोलंदाज आर विनय कुमारची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती”

या सरकारचं कामकाज म्हणजे अजब सरकार की गजब कहाणी- सुधीर मुनगंटीवार

“संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here