आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नागपूर : विधान परिषदेची निवडणूक येत्या 20 जून रोजी होणार आहे. त्यामुळे आता सर्वच मतांची जुळवाजुळव करण्यासाठी इतर पक्षातील आमदारांसह अपक्ष आमदारांशी संपर्क साधत आहेत. अशातच अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेसोबत असल्याचे स्पष्ट केलं आहे.
पक्षनिष्ठेचे बक्षिस म्हणून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भोंडेकर यांना मंत्रिपद देणार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे भोंडेकर यांना राज्यमंत्री दर्जाचे पद मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
हे ही वाचा : अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्यात देवगिरी बंगल्यावर खलबतं: चर्चांना उधाण
दरम्यान, येत्या 20 जूनला होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीनंतर भंडारा जिल्ह्याला ही मंत्रीपदाची लॉटरी लागणार आहे. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेसोबत राहण्यासाठी त्यांना महामंडळाची ऑफर त्यांना देण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
पंतप्रधानांच्या कार्यक्रमात अजित पवारांसोबत काय घडलं?; देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा, म्हणाले…
पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या; अमोल मिटकरींचा टोला