आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आज लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर होत आहेत. यातच मुंबई उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड आणि भाजपचे उज्ज्वल निकम यांच्यात लढत होती. ही लढत अत्यंत चूरशीची झाल्याचं पाहायला मिळालं.
सुरुवातीला काही काळासाठी वर्षा गायकवाड यांनी आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर उज्ज्वल निकम यांनी आपले मताधिक्य वाढवत नेले. मध्यंतरीच्या काळात उज्ज्वल निकम यांचे मताधिक्य 56 हजारापर्यंत पोहोचले होते.
ही बातमी पण वाचा : अहमदनगरमध्ये विखे घराण्याला मोठा धक्का; निलेश लंकेंनी उधळला विजयाचा गुलाल
दरम्यान, शेवटच्या फेरीत उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यात अवघ्या 176 मतांचा फरक होता. त्यामुळे कोण जिंकणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर वर्षा गायकवाड यांनी निसटती आघाडी घेत उज्ज्वल निकम यांचा पराभव केला.
महत्त्वाच्या बातम्या –
बारामतीकरांचा पाठिंबा लेकीलाच; सुनेत्रा पवार यांचा तब्बल ‘इतक्या’ मतांनी पराभव
“लोकसभा निवडणूक निकालावर शरद पवार यांची सर्वात पहिली प्रतिक्रिया”
शिरुरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांना धक्का; अमोल कोल्हे आघाडीवर कायम