आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड करत शिवसेनेत मोठी फूट पाडली. आणि शिंदेंनी भाजपसह सरकार स्थापन केलं. त्यानंतर शिवसेनेत गळती सूरू झाली. मात्र आता अशातच शिवसेनेचं बळ वाढलं आहे.
भाजपच्या माजी नगरसेविकेनं भाजपला धक्का देत शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधलं आहे. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याविषयी ट्विट केलं आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आज नाशिक येथील भाजप नगरसेविका पूनम धनगर जी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला., असं शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलमध्ये म्हटलं आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आज नाशिक येथील भाजप नगरसेविका पूनम धनगर जी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. pic.twitter.com/r75FmNWFQy
— Shivsena Communication (@ShivsenaComms) September 23, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
‘या’ कारणासाठी ज्योतिषी नेमणे आहे; मनसेने शिंदे सरकारला डिवचलं
नारायण राणे थर्ड क्लास व्यक्ती आहे; शिवसेनेची टीका