आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नितीन देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफासते लावून आत्महत्या केली. या निधनाची बातमी समजताच. अनेक राजकीय नेते तसेच कलाकार त्यांनी आदरांजली वाहत आहेत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज विधानभवनात आले होते. ठाकरेंना नितीन देसाईंविषयी विचारलं असता, त्यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
आज नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येची घटना घडली. नितीन देसाईंसारख्या माणसाने असं पाऊल उचलणं, हा मोठा धक्का आहे. त्यांना अशा प्रकारे श्रद्धांजली वाहावी लागेल असं वाटलं नव्हतं., असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ही बातमी पण वाचा : “मोठी बातमी! संभाजी भिडेंचा खून करणार; माजी राज्यमंत्र्यांचा इशारा, फडणवीसांना लिहिलं पत्र”
एक कलाकार म्हणून नितीन देसाई हे माझ्यासह सगळ्यांशी मिळून मिसळून जायचे. त्यांच्या लेखी अशक्य काही नव्हतं. एखादी गोष्ट करायची म्हटली की ते करायचे. असा एक उमदा कलावंत आपल्यातून अशा पद्धतीने जावा ही मोठी दुःखद घटना आहे. असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
याचा अर्थ, फडणवीसांनी मान्य केलं की, संभाजी भिडेंना त्यांनीच…; भास्कर जाधवांचं वक्तव्य चर्चेत
धक्कादायक ! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या
“मराठीमध्ये व्हिडिओ रिल्स बनविणाऱ्यांना, राज ठाकरेंनी दिली ‘ही’ जबाबदारी”