Home महाराष्ट्र उद्धव ठाकरे 15 दिवसात राजीनामा देणार होते, मात्र…; शिंदे गटातील प्रवक्ते दीपक...

उद्धव ठाकरे 15 दिवसात राजीनामा देणार होते, मात्र…; शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकरांचा मोठा गाैफ्यस्फोट

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. अशातच आता शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकर यांनी एक मोठा गाैफ्यस्फोट केला आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेची भाजपासोबत चर्चा सुरू होती, असा मोठा गाैफ्यस्फोट दीपक केसरकरांनी यावेळी केला. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे ही वाचा : “शिवसेनेनं खातं उघडलं; ‘या’ निवडणूकीत सर्व 7 जागांवर मारली बाजी”

उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली होती. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, मला माझ्या पदापेक्षा तुमच्याशी असलेल्या कौटुंबिक संबंधाला जास्त महत्त्व देतो. त्याच वेळेला त्यांनी आपल्या पदाचा त्याग करायचे ठरवले होते. पुढच्या 15 दिवसांत ते आपल्या पदाचा त्याग करणार होते. मात्र दरम्यानच्या काळात भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन झाले. निलंबन झाल्यानंतर भाजपाकडून निरोप आला होता. आपली बोलणी सुरू आहे. असे निलंबन योग्य नाही, असे मत भाजपाने व्यक्त केले होते. पुढे कोर्टाने हे निलंबन रद्द ठरवण्यात आले. पुढे केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांचा समावेश करण्यात आला. नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याचे उद्धव ठाकरे यांना आवडले नाही. याच कारणामुळे ही बोलणी थांबली, असा मोठा गाैफ्यस्फोट दीपक केसरकरांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला मोठा धक्का! ‘हा’ नेता करणार शिंदे गटात प्रवेश?

जळगावमध्ये भाजपने गुलाब पाहिला, पण आता…; उद्धव ठाकरेंचा गुलाबराव पाटलांवर निशाणा

राजसाहेब आमचे दैवत, आम्ही कायम त्यांच्यासोबत, शिंदे गटात आमची फसवणूक झाली; ‘या’ मनसैनिकांचा आरोप