आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सिंधुदुर्ग : कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापलं असून अशातच नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
कोकणातील जैतापूर येथील वीजनिर्मितीचा प्रकल्प होऊ नये, यासाठी 34 कोळसा उत्पादकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. हा प्रकल्प जैतापूरला होऊ देऊ नका, आम्ही तुम्हाला मदत करतो, पैसे देतो, असे उद्योजक उद्धव ठाकरेंना म्हणाले होते, असं उध्दव ठाकरेंनी म्हटलं आहे.
ही बातमी पण वाचा : एकनाथ खडसेंचा भाजपला धक्का; बोदवडचा गड राखला
मी विधानसभेतही बोललो आहे हे. 5 कोटी बयाणा म्हणून घेतले आणि 500 कोटींचा व्यवहार झाला. लोकं अंधारात राहिले तरी चालतील, बेकारी आली तरी चालेल, कारखाने नाही आले तरी चालेल, पण पैसा आला पाहिजे, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली होती. आणि आता दुसऱ्यांना खोके घेतले म्हणून आरोप करायचे हे महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल. बाळासाहेबांच्या चिरंजीव बाळासाहेबांच्या नखाची सर करू शकत नाही. यांना राजकारण काय असते हे माहिती नाही. उद्धव ठाकरेंना कोकणात येऊ द्या, असंही नारायण राणे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
शरद पवारांच्या आत्मचरित्र्यात भाजप-शिवसेनेबद्दल मोठा खुलासा, म्हणाले…
नाना पटोलेंना मात देण्यासाठी, राष्ट्रवादीची भाजपसोबत युती, मात्र काँग्रेसनं गड राखला”
“ना रोहित पवार, ना राम शिंदे; कर्जत बाजार समितीत कोणी मारली बाजी?”