Home महाराष्ट्र शरद पवारांच्या आत्मचरित्र्यात भाजप-शिवसेनेबद्दल मोठा खुलासा, म्हणाले…

शरद पवारांच्या आत्मचरित्र्यात भाजप-शिवसेनेबद्दल मोठा खुलासा, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित होणार आहे. हे पुस्तक छापून तयार झालं आहे. या पुस्तकातून शरद पवार यांनी अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत.

भाजप आणि शिवसेनेतील वाढलेलं अंतर आमच्यासाठी शुभसंकेत होता, असा दावा शरद पवारांनी या पुस्तकात केला असून  शिवसेना आणि भाजपमध्ये 2019 मध्ये अंतर का वाढलं? याची माहितीही शरद पवारांनी या पुस्तकात दिली आहे.

ही बातमी पण वाचा : “नाना पटोलेंना मात देण्यासाठी, राष्ट्रवादीची भाजपसोबत युती, मात्र काँग्रेसनं गड राखला”

शरद पवारांनी नेमकं काय नमूद केलं आहे, पुस्तकात?

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत यापूर्वी शिवेसना 171 आणि भाजप 117 जागा लढत असे. पण 2019 नंतर चित्रं बदललं. 2019मध्ये शिवसेनेने 124 जागा लढल्या. तर भाजपने 164 जागा पदरात पाडून घेतल्या. स्वत: च्या बळावर बहुमत मिळवत शिवसेनेचं ओझं उतरवून ठेवायचं असा चंग अति आत्मविश्वासात दंग भाजपने बाळगला होता. नारायण राणे हे शिवसेनेच्या दृष्टीने गद्दार. पण भाजपमध्ये विलीन करून घेत सेनेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं. राज्यातील 50 मतदारसंघात बंडखोरांचं आव्हान होतं. त्यातील बहुतांशी ठोकलेले दंड नेत्यांच्या आशीर्वादने आणि पक्षाच्या बळावर होते, असं शरद पवार यांनी पुस्तकात म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“ना रोहित पवार, ना राम शिंदे; कर्जत बाजार समितीत कोणी मारली बाजी?”

“ठाकरेंच्या शिलेदाराकडून, शिंदेंच्या शिलेदाराचा करेक्ट कार्यक्रम, मालेगावात ठाकरेंचं वर्चस्व”

राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी कोकणात येऊन दाखवावं, आता संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले…