Home अहमदनगर “ना रोहित पवार, ना राम शिंदे; कर्जत बाजार समितीत कोणी मारली बाजी?”

“ना रोहित पवार, ना राम शिंदे; कर्जत बाजार समितीत कोणी मारली बाजी?”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील तब्बल 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान पार पडले असून कर्जत जामखेडमधलाही निकाल समोर आला आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या या कर्जत जामखेड बाजार समितीचा निकाल हा हास्यास्पद लागला आहे.

ही बातमी पण वाचा :“ठाकरेंच्या शिलेदाराकडून, शिंदेंच्या शिलेदाराचा करेक्ट कार्यक्रम, मालेगावात ठाकरेंचं वर्चस्व”

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यात चांगलीच चुरस लागलेली होती. पण या निवडणुकीचा निकालच अनोखा लागला आहे. एकूण 18 जागांसाठी ही निवडणूक पार पडली. यापैकी 9 जागांवर राम शिंदे यांच्या गटाचे उमेदवार निवडून आले. तर उर्वरित 9 जागांवर रोहित पवार यांचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता सभापती आणि उपसभापती कोणत्या गटाचा होणार? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी कोकणात येऊन दाखवावं, आता संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

राष्ट्रवादीची भाजपशी हातमिळवणी; काँग्रेसचा दारुण पराभव

जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम, इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीची एकहाती सत्ता