उद्धव साहेब, मी तुमच्यासोबत; बीडच्या कट्टर शिवसैनिकानं रक्तानं लिहिलं पत्र

0
405

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. अजूनही स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. अशातच बीडच्या एका कट्टर शिवसैनिकानं चक्क रक्तानं शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी प्रतिज्ञापत्र लिहिलं.

शिवसेनेतील आमदार, खासदार आणि पदाधिकारी जरी पक्षाला सोडून गेले असले तरी सर्वसामान्य शिवसैनिक मात्र अद्यापही शिवसेना पक्षासोबत आहेत. बीडच्या अंबाजोगाई शहरातील अक्षय भूमकर या शिवसैनिकाने, स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून पक्षावरील निष्ठा दाखवून दिली आहे.

हे ही वाचा : “देशाला नवे राष्ट्रपती मिळणार; आज मतमोजणी, कोण मारणार बाजी?, यशवंत सिन्हा की द्राैपदी मुर्मू”

‘मी शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ माझ्या स्वतःच्या रक्ताने लिहिलेले प्रतिज्ञापत्र एक शिवसैनिक म्हणून सादर केले. ज्यांना ज्यांना शिवसेनेने मोठे केले असे आमदार, खासदार पदाधिकारी हे सर्वजण आज पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची साथ सोडून जात आहेत. मात्र, शिवसेना या चार अक्षरांपासून मिळालेली ओळख हेच सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी पुरेसे आहे. ते आजही तनमनधनाने उध्दव ठाकरे व शिवसेनेसोबतच आहेत. शिवसेना हे चार अक्षरी नाव ज्वलंत ठेवण्यासाठी परिश्रम घेतील. असा आशावाद अक्षयने आपल्या प्रतिज्ञापत्रात व्यक्त केला आहे, अक्षय भूमकर यांचे हे रक्ताने लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. तर दुसरीकडे उस्मानाबाद तालुक्यातील अनसुर्डा येथील पाडुरंग माने या शिवसैनिकाने स्वःताच्या रक्ताने उद्धव ठाकरेंना पाठिंब्याचे पत्र लिहिले आहे. “मी उद्धव ठाकरे साहेबांसोबत, असं पत्र लिहित अक्षय भूमकर या शिवसैनिकांनं पक्षावरची असलेली निष्ठा दाखवून दिली आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

एकनाथ शिंदेंचा मला देखील फोन आला होता, पण मी….; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराचा मोठा गाैफ्यस्फोट

शिवसेना प्रमुख कोण?; रावसाहेब दानवेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

ओबीसी आरक्षणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here