मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसबाबत जनजागृती व्हावी, म्हणून मागच्या 5 महिन्यांपासून फोनवर कॉल करण्याआधी कॉलर ट्यून वाजत आहे. पण ही कॉलर ट्यून आता बंद करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाने गेली अनेक महिने कॉलर ट्यून म्हणून कोरोना ची माहिती देण्यात येत आहे. परंतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यून मुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असलेतरी विलंब होतो अथवा लागत नाही. त्यामुळे जी काही जनजागृती करायची ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होतच आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी, अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विट करत केली आहे.
कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाने गेली अनेक महिने कॉलर ट्यून म्हणून कोरोना ची माहिती देण्यात येत आहे. परंतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यून मुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असलेतरी विलंब होतो अथवा लागत नाही,
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) August 20, 2020
त्यामुळे जी काही जनजागृती करायची ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होतच आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी.@abpmajhatv ,@News18lokmat ,@zee24taasnews ,@TV9Marathi ,@MySarkarnama
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) August 20, 2020
महत्वाच्या घडामोडी-
राज्याचा कारभार कसा करावा हे महाविकास आघाडी सरकारला शिकवू नये- रुपाली चाकणकर
“जानेवारी ते डिसेंबर शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबत केंद्राशी विचारविनिमय”
राजू शेट्टी सरड्यासारखे रंग बदलतात; सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना टोला
“सुशांत प्रकरणाचा सीबीआय तपास डॉ. दाभोलकर हत्या चौकशीप्रमाणे होऊ नये”