Home महाराष्ट्र “जानेवारी ते डिसेंबर शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबत केंद्राशी विचारविनिमय”

“जानेवारी ते डिसेंबर शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबत केंद्राशी विचारविनिमय”

मुंबई : कोरोनाच्या परिस्थितीमुळे सध्या सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात बैठक झाली. तसेच भविष्यात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तरी प्रत्यक्ष शाळा काही प्रमाणात सुरु करता येतील का? यावरही बैठकीत चर्चा झाली.

नेहमी जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु होते. मात्र सध्याचा काळ पाहता जानेवारी ते डिसेंबर असे शैक्षणिक वर्ष सुरु करता येते का त्याबाबत केंद्राशी विचारविनिमय करण्याची सूचना उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

दरम्यान, या नव्या धोरणात अनेक नव्या संकल्पना आहेत. त्यादृष्टीने राज्य सरकारला कायद्यातही अनेक बदल करावे लागतील. काही आवश्यक आणि अनिवार्य बदल स्वीकारावेच लागतील तर जे स्वीकारले जाऊ शकत नाही किंवा त्यात काही अडचणी आहेत तर त्याबाबतही विचार करावा लागेल. या दृष्टीने या धोरणाची सध्या केवळ घोषणा करण्यात आली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राजू शेट्टी सरड्यासारखे रंग बदलतात; सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना टोला

“सुशांत प्रकरणाचा सीबीआय तपास डॉ. दाभोलकर हत्या चौकशीप्रमाणे होऊ नये”

न्यायालय आणि कायद्याचा आदर करण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर; त्यामुळे…

सामनाचे संपादक तोंडावर पडले- नारायण राणे