Home विदेश “ट्रम्प यांनी चीनला दिला दणका; अडचणीत आणणाऱ्या विधेयकावर केली स्वाक्षरी”

“ट्रम्प यांनी चीनला दिला दणका; अडचणीत आणणाऱ्या विधेयकावर केली स्वाक्षरी”

वॉशिंग्टन : भारत-चीन सीमेवर तणाव सुरू असताना अमेरिकेतून चीनला एक दणका बसला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधल्या अल्पसंख्याकांचा छळ करणाऱ्यांच्या विरोधातल्या एका विधेयकाला मंजुरी दिली आहे. या नव्या कायद्यामुळे चीनवरचा दबाव वाढणार आहे.

चीनमध्ये उइगर मुस्लिमांविरोधात होणाऱ्या मोहिमेत सहभागी झालं तर आता अमेरिका कारवाई करणार आहे. उइगर मुस्लिमांच्या मानवी हक्कांचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने अमेरिकेनं हे पाऊल उचललं आहे. उइगरांचा छळ करणाऱ्यांवर थेट कारवाईची तरतूद या अमेरिकन कायद्यात आहे.

दरम्यान, वर्ल्ड उइगर काँग्रेस या उइगर मुस्लिमांच्या मोठ्या संघटनेने डोनाल्ड ट्रम्प यांचे या नव्या विधेयकासाठी आभार मानले आहेत. उइगर जमातीसाठी यातून आशेचा किरण दिसत असल्याची प्रतिक्रिया या संघटनेने दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“अर्थमंत्री यांची LIVE पत्रकार परिषद; ‘या’ योजनेबाबत महत्त्वाच्या घोषणा”

काँग्रेस नेते ‘मातोश्री’वर पोहोचले; संजय राऊतही उपस्थित

“काँग्रेसच्या नाराज मंत्र्यांना अखेर मुख्यमंत्री भेटीची वेळ मिळाली”

मोदीजी सर्जिकल स्ट्राइक करा; माझ्या शहीद पतीचे बलिदान व्यर्थ जायला नको