आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पेट्रोल, डिझेल तसेच गॅसच्या वाढत्या किमतीविरोधात तसेच मोदी सरकारच्या नीतीविरोधात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचं एकही वक्तव्य नाही. त्या कुठे आहेत, असा रोखठोक सवाल काँग्रेसचे नेते तथा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला आहे.
हे ही वाचा : “शिवसेना-भाजपने एकत्रं यायला हवं, त्याशिवाय पर्यायच नाही”
गॅस आणि इंधन दरवाढीमुळे देशभरात रोष व्यक्त करण्यात येतोय. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या उत्पदन शुल्कात कपात केली असली तरी इंधनाचे दर आणखी कमी करण्याची मागणी केली जातेय. या पार्श्वभूमीवर भाववाढ, वाढती महागाई, बेरोजगारी या समस्यांना घेऊन मुंबई काँग्रेसने पदयात्रेचे आयोन केले होते. या यात्रेदरम्यान भाई जगताप बोलत होते.
“मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढला गेलाय, असं जरी सांगितलं जात असलं तरी याला पार्श्वभूमी आहे. महागाई, वाढत्या बेरोजगारीविरोधातील हे शक्तिप्रदर्शन आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत्या किमतीविरोधात स्मृती इराणी यांचं एकही वक्तव्य नाही. त्या कुठे आहेत,” असं भाई जगताप म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने लातूरमध्ये जिल्हा विधी प्राधिकरण शिबीराचे आयोजन
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती नाजूक; पुण्यात उपचार सुरू
परळीत माफियाराज सूरू आहे; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल