Home पुणे “शिवसेना-भाजपने एकत्रं यायला हवं, त्याशिवाय पर्यायच नाही”

“शिवसेना-भाजपने एकत्रं यायला हवं, त्याशिवाय पर्यायच नाही”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : ज्या कारणाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याचा प्रत्यय मला आहे. सध्याचं जे गणित आहे ते चुकलेलं आहे. हे सुधारायचं असेल तर शिवसेना आणि भाजप एकत्रं आल्याशिवाय पर्याय नाहीच, असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केलं आहे.

हे ही वाचा : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने लातूरमध्ये जिल्हा विधी प्राधिकरण शिबीराचे आयोजन

शिवसेना-भाजप एकत्र यावेत म्हणून माझे प्रयत्न सुरू आहेत. तुमचं तरी काय बिघडलं असतं. ती चूक झाली. ज्यांना फॉलोअर्स असतील त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या आघाडीसाठी पुढाकार घाययला हवा, मी घेतोय पुढाकार, असं विक्रम गोखले म्हणाले. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केलं.

दरम्यान, शिवसेना-भाजप युतीबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. तेव्हा चूक झाली असं उत्तर फडणवीसांनी दिलं होतं. दोन्ही पक्षांनी अडिच अडिच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं? असंही विक्रम गोखलेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती नाजूक; पुण्यात उपचार सुरू

परळीत माफियाराज सूरू आहे; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

“टी-20 वर्ल्डकपवर ऑस्ट्रेलियाचा वर्चस्व; न्यूझीलंडला नमवत पहिल्यांदाच आयसीसी ट्राॅफीवर कोरलं नाव”