‘आजच्या दिवशी महात्मा गांधीजींचा वध नथुराम गोडसेने केला’; नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

0
480

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पुन्हा एक खळबळजनक विधान केलंय. महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या दिवशी एका कार्यक्रमात बोलताना नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा वध केला असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं आहे त्यामुळे ने पुन्हा वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हे ही वाचा : मनसेत जोरदार इनकमिंग; परभणीमधील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी हाती धरला मनसेचा भगवा

काँग्रेसने आतापर्यंत नेहमीच महात्मा गांधींचा वध अशा शब्दप्रयोगाला आक्षेप घेतलेला आहे. मात्र आज खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडूनच आणि महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या दिवशीच अशा शब्दप्रयोग केला गेल्याचं समोर आलं आहे. नानांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गोडसेच्या मते गांधींचा वध झाला, अशा अर्थाने मी ते वाक्य बोललो होते, असे स्पष्टीकरणही नाना पटोलेंनी भाषणानंतर दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

नॉटी नामर्द, बिगडे नवाब, नन्हे पटोले…; अमृता फडणवीसांचं नवं ट्विट

शिवसेना-भाजप एकत्र येणार का?; संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले…

निवडणूक लढवायला बायको पाहिजे, तरुणाने लावले बॅनर; भाजपच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here