पोलिस दलाला जनतेच्या मनातून उतरवणाऱ्यांची गय केली जाणार नाही; अजित पवारांचा इशारा

0
156

मुंबई : पोलीस दलाच्या कामकाजाला गालबोट लावण्याचं काम कुणी करत असेल, जनतेच्या मनातून पोलीस दलाला उतरवण्याचं काम कुणी करत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

जी वस्तुस्थिती आहे, जे खरं सत्य आहे ते महाराष्ट्रातील जनतेसमोर 100 टक्के येईल. काळजी करण्याचं कारण नाही. गेले काही दिवस राज्यात जे काही वातावरण तयार करण्यात आलं. त्यामध्ये कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. चौकशा सुरू आहेत, असंही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, अजित पवारांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

मनसे आमदार राजू पाटील करोना पॉझिटिव्ह

अहो उद्धवजी, राज्यात तुमचे दीड वर्षातील पराक्रम पाहता…; चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे प्रवक्ते?; प्रवीण दरेकरांचा सवाल

…तर देवेंद्र फडणवीस यांचीही चाैकशी करा- नाना पटोले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here