Home महाराष्ट्र संसदेचं नेतृत्व करणाऱ्यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी वेळ दिला पाहिजे- जयंत पाटील

संसदेचं नेतृत्व करणाऱ्यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी वेळ दिला पाहिजे- जयंत पाटील

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. तसेच मराठा समाजाने आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन सुरू केलं आहे., यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा समाजाने आरक्षण मिळावे म्हणून मोठं आंदोलन केलं आहे. पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टात मराठा समाजाच्या विरोधात निर्णय लागलेला आहे. आता त्यातून मार्ग काढण्यासाठी दिल्ली दरबारातच आणि संसदेत यातून मार्ग निघू शकतो. त्यामुळे संसदेचं नेतृत्व करणाऱ्यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी विचार केला पाहिजे आणि वेळ दिला पाहिजे, असं जयंत पाटील यांनी यावेळी म्हटलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, मराठा आरक्षणावर तिनही पक्ष एकाच भूमिकेत आहेत. कुणाचीही वेगवेगळी भूमिका नाही आणि मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं यामध्ये दुमतही नाही. मराठा आरक्षणाबाबत सर्व काम ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आलं आहे. ते याबाबतीत कायदेशीर सल्ला घेणं, योग्य ती पावले टाकणं याविषयी मंत्रीमंडळातील सदस्यांशी सल्लामसलत करून अंतिमदृष्टया कार्यवाही करत असतात. त्यामुळे मराठा आरक्षणावर आवश्यक व योग्य ते विधान अशोक चव्हाणच करतील, असंही मत जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं.

महत्वाच्या घडामोडी –

“महाराष्ट्रात 7 जूनपासून अनलाॅक, 5 टप्प्यात लाॅकडाऊन उठणार; पहा काय सुरू, काय बंद?”

मी सारखा झोपेतून उठतो की सरकार पडलं का काय…; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

सरकार पडणं भाजपाच्या अजेंडाचं बायप्रॉडक्ट- देवेंद्र फडणवीस

बीडमधील मराठा मोर्चाला प्रशासनाची गरज नाही, मोर्चा निघणारच- विनायक मेटे