आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव हे एकनाथ शिंदे यांना दिले आहे. यानंतर उध्दव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर ठाकरे गटाकडून शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.
ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात पाणी आणले, त्या शत्रूला सोडणार नाही, असा इशारा ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी यावेळी दिला.
हे ही वाचा : “अंकल, अंकल, काकीला सांगील, मग…; अजित पवारांनी सभागृहात बोलताच, एकच हशा पिकला”
उत्कृष्ट जगातील, देशातील मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी नाव कमावलं आहे. ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात पाणी आणले त्या शत्रूला सोडणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. त्याचबरोबर आमची मशाल यांच्या बुडाला लागणार आहे आणि यांना टेकू दिले जाणार नाही, असा टोला पेडणकरांनी यावेळी लगावला.
दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीचा उद्या निकाल जाहीर होणार आहे. त्या निकालाविषयी किशोरी पेडणेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपलाच उमेदवार विजयी होणार असल्याचं सांगत उद्याचा निकाल लागला की, एक एक पिस कसं काढायचं, याची तयारीच करा, असा विश्वासही पेडणेकरांनी यावेळी व्यक्त केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
“मनसेत गटबाजी की चूक?; नाशिकमधील ‘त्या’ बॅनरवरून राजकीय चर्चांना उधाण”
भाजपने आधी स्वतःचे घर सांभाळावं आणि मगच…; ठाकरे गटाचा भाजपावर निशाणा
न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने लागला नाही तर रक्तपात होईल; ठाकरे गटाचं खळबळजनक वक्तव्य