आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : विजयादशमीचा मुहूर्तावर मनसेने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मनसेने शिवसेना भवनाबाहेर ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असं पोस्टर लावत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला टोला लगावला आहे. यावर शिवसेना नेते तसेच जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘जे स्वतः स्टेबल नाहीत, त्यांनी गर्वसे कहो हम हिंदू है म्हणू नये.’ असं जोरदार प्रत्युत्तर गुलाबराव पाटलांनी यावेळी मनसेला दिलं.
हे देखील वाचा : 2024 मध्ये शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असेल- संजय राऊत
मनसेने स्थापनेवेळी सर्वधर्म समभावचा नारा दिला होता. पण, नंतर त्यांनी परप्रांतीयांच्या कानात मारली आणि झेंडा बदलला. पुन्हा मराठीपणा आणला. आज ते म्हणताय की गर्वसे कहो हम हिंदू है. मात्र, गर्वसे कहो हम हिंदू है असे आमचे बापजादे म्हणत होते. ही सर्व शिवसेनेचीच पिलावळ आहे, असा हल्लाबोल गुलाबराव पाटलांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
अनंत करमुसे मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक
सायकल चोरणारे नारायण राणेही शिवसेनेमुळे मुख्यमंत्री झाले- गुलाबराव पाटील
बाकी ठिकाणी धाडी पडल्या तर चालते, आणि घरी पडल्या तर…- चंद्रकांत पाटील