Home महाराष्ट्र अनंत करमुसे मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक

अनंत करमुसे मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक

ठाणे :  सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट टाकली म्हणून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील अनंत करमुसे यांचे अपहरण करून मारहाण करण्याप्रकरणी त्यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. लगेच त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

ही मारहाण आव्हाड यांच्या समोर करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भाजपाच्या नेत्यांनी राज्यपालांना निवेदन देऊन दोषी पोलिस आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर दोषी पोलिसांना अटक करून त्यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, आव्हाड यांच्यावर कारवाई न झाल्याने करमुसे आणि भाजपच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवून अटकेची मागणी लावून धरली होती.

हे ही वाचा-  सायकल चोरणारे नारायण राणेही शिवसेनेमुळे मुख्यमंत्री झाले- गुलाबराव पाटील

गुरुवारी आव्हाड गुरुवारी स्वतः सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वर्तकनगर पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला, नंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायमूर्तींनी त्यांना 10 हजार रुपयांच्या जामिनावर सोडले.

दरम्यान, भाजपाचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ‘अखेर ठाकरे सरकरचे मंत्री जितेंद्र आव्हाड याना अनंत करमुसे अपहरण आणि मारहाण प्रकरणी अटक झाली’ असं ट्विट करत आव्हाडांच्या अटकेची माहिती दिली.

महत्वाच्या घडामोडी –

बाकी ठिकाणी धाडी पडल्या तर चालते, आणि घरी पडल्या तर…- चंद्रकांत पाटील

मी कोणत्याही मंत्रीपदावर नाही, याचं मला कोणतंही दु:ख नाही- पंकजा मुंडे

क्या हुआ तेरा वादा?; पुण्यात राष्ट्रवादी भाजपला करुन देणार वायद्यांची आठवण