मुंबई : मुंबईत एका नटवीची बाजू घेऊन तिच्या बेकायदा बांधकामासाठी उभे राहिलेल्यांनी आता हाथरसला जाऊन पीडित मुलीसाठी रस्त्यावर बसून तिच्या न्यायाची लढाई लढावी, असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाण सधला आहे.
एका नटवीच्या बेकायदा बांधकामासाठी काही लोकांनी आकांडतांडव केलं होतं. आता त्यांनी हाथरसला जाऊन दलित, शोषित समाजातील पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायाची लढाई लढवली पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
जेव्हा दलित, शोषित समाजातील मुलगी आक्रोश करते तेव्हा तिचा आवाज जगापर्यंत पोहोचू नये म्हणून दडपशाही केली जाते, असं सांगतानाच पीडित मुलगी सेलब्रिटी नव्हती म्हणून तिला न्याय नाकारणं हे रामराज्याच्या गप्पा मारणाऱ्यांना शोभत नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राऊत यांनी हाथरस येथील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवतानाच पीडित मुलीला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणीही यावेळी संजय राऊत यांनी केली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“उत्तर प्रदेशमध्ये जे घडलं ते महाराष्ट्रात सहन करणार नाही”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घराच्या बाहेर पडावं अन्यथा…; मराठा आंदोलकांचा इशारा
हा लढून मरणारा समाज आहे हे लक्षात ठेवा- छत्रपती संभाजीराजे
“भाजप नेते नारायण राणे यांना कोरोनाची लागण”