Home महाराष्ट्र “…यावेळी आमच्याकडे भक्कम पुरावा लागलाय; मनसेचं थेट ईडीलाच पत्र”

“…यावेळी आमच्याकडे भक्कम पुरावा लागलाय; मनसेचं थेट ईडीलाच पत्र”

मुंबई : आगामी मुंबई पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिंदे गटासोबतच, मनसे तसेच महाविकास आघाडीतील तिनही पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. अशातच सातत्याने मनसेकडून शिवसेनेच्या काळातील पालिकेच्या कारभारावर टीका केल्याचं पाॉहायला मिळत आहे.

अशातच आता मनसेनं थेट ईडीलाच पत्र पाठवलं असून, यंदा आपल्या हाती भक्कम पुरावा लागल्याचं या पत्रात मनसेकडून नमूद करण्यात आलं आहे. मनसेकडून आर्थिक गुन्हे शाखेच्या सह पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रामध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

हे ही वाचा : अजित पवार-देवेंद्र फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीवर संजय राऊतांचं महत्वाचं विधान, म्हणाले…

करोना काळा पालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मोठा घोटाळा केला गेला. करोना काळात चौकशीची मागणी होत होती. पण कंत्राटाची चौकशी करता येणार नसल्याचं पालिकेनं सांगितलं होतं. मनसेनं सुरुवातीपासून यासंदर्भात आवाज उठवला आहे. पण यावेळी घोटाळ्याचा भक्कम पुरावा आमच्या हाती लागला आहे, असं या पत्रात नमूद केलं आहे.

करोना काळात कोणताही अनुभव नसलेल्या कंपनीला वेगवेगळी कंत्राटे देण्यात आली. त्यात मालाड व रिचर्डसन कुडास येथे करोना सेंटर्स उभारले होते. या सेंटरमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून जेवण, लाँड्री, सेनिटायझर पुरवठा अशी कंत्राटं युवासेना पदाधिकारी वैभव थोरात यांनी तयार केलेल्या ठक्कर अड पवार कंपनी, शिवसेनी एंटरप्रायजेस, शिवचिदंबरम फार्मा, रमेश अँड असोसिएट, अर्का कंपनी, देवराया एंटरप्रायजेस, जय भवानी एंटरप्रायजेस व ग्रीन स्पेस रिएल्टी या कंपन्यांना देण्यात आले. या कंत्राटांमागे कुणाचा सहभाग होता, याची चौकशी होणं गरजेचं आहे, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

या कंपन्यांनी मागणीच्या अवघा ३० ते ४० टक्के पुरवठा करूनही बिलं मात्र १०० टक्के पुरवठ्याची सादर केली. त्यामुळे जवळपास २५ ते ३० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा घोटाळा सहाय्यक आयुक्त व लेखा अधिकारी यांच्या संगनमताने झाल्याचं दिसतंय”, असा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

भारताचा न्यूझीलंडवर 6 गडी राखून विजय ; मालिकेत 1-1अशी साधली बरोबरी

भारताच्या मुलींनी रचला इतिहास; पहिल्याच टी20 विश्वचषकावर कोरले नाव

“भाजपकडून शिवसेनेला मोठं खिंडार; रायगडमधील तब्बल ‘इतके’ शिवसैनिक भाजपमध्ये करणार प्रवेश”