आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून हा मतदारसंघ राखण्यासाठी भाजपने कसब्याचे आमदार राहिलेले गिरीश बापट यांना आजारपणात ही पक्षाच्या प्रचारासाठी मैदानात उतरविले आहे. आजारी असतानाही त्यांना प्रचारासाठी आणल्यामुळे राष्ट्रवादीकडून भाजपवर टीका केली जात आहे.
“गिरीश बापट उद्यापासून प्रचारात उतरत आहेत. मुळातच त्यांची प्रकृती अस्वस्थ असताना भाजपने त्यांना प्रचारासाठी येण्याची गळ घातली आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपवर टीका केली आहे.
हे ही वाचा : ‘शिवसेने’च्या निकालावर आता उद्धव ठाकरेंची पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…
गेल्या पाच वर्षात गिरीश बापट यांना भाजपने पक्षांच्या निर्णयापासून लांब ठेवले. भाजपचे मेळावे, कार्यक्रम यामध्ये साधे त्यांचे फोटोही लावले नाहीत. मात्र आज कसब्यात भाजपचा उमेदवार अडचणीत आल्यावर देशातील, राज्यातील नेत्यांना बापट यांची आठवण झाली. हेच भाजपच पराभवाचं लक्षण आहे. गिरीश बापट यांना आजारपणातही प्रचारात उतरवून भाजप त्यांच्या जीवाशी खेळत आहे, असंही प्रशांत जगताप म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर, राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर, राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
पोटनिवडणुकीच्या तोंडवर चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश