Home महाराष्ट्र ‘शिवसेने’च्या निकालावर आता उद्धव ठाकरेंची पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

‘शिवसेने’च्या निकालावर आता उद्धव ठाकरेंची पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे. यावरून आता उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे.

काय सुरुवात करायची आणि काय बोलायचे हा मोठा प्रश्न आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. मी तर असे म्हणेन की दुर्दैदाने आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर घोषणा करायला हरकत नाही की 75 वर्षांचे स्वातंत्र्य संपलं आहे. आम्ही बेबंदशाहीला सुरुवात केली आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली.

हे ही वाचा : निवडणूक आयोगाच्या निर्णयावर, राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान, मी, म्हणालो होतो की, न्यायालयाकडून निकाल दिला जात नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगने कोणताही निकाल देऊ नये. पक्ष कोणाच्या बरोबर आहे. कोणाच्या बरोबर आहे, हे केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या आकड्यांवर ठरवले जात असेल तर कोणीही धनाढ्य माणूस निडवून आलेले खासदार, आमदार विकत घेऊन पक्षाच सर्वेसर्वा होऊ शकतो. देशाचा पंतप्रधान, राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, हेदेखील मी मगे बोललेलो आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर, राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पोटनिवडणुकीच्या तोंडवर चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

“कसबा निवडणूकीत नवा ट्विस्ट; महाविकास आघाडीचे उमेद्वार मनसे कार्यालयात, मनसेकडून जंगी स्वागत, चर्चांना उधाण”