Home पुणे पोटनिवडणुकीच्या तोंडवर चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

पोटनिवडणुकीच्या तोंडवर चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

545

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे :  चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

पिंपरी चिंचवड पोटनिवणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु असताना आज राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आकुर्डी येथे त्यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला.

हे ही वाचा : “कसबा निवडणूकीत नवा ट्विस्ट; महाविकास आघाडीचे उमेद्वार मनसे कार्यालयात, मनसेकडून जंगी स्वागत, चर्चांना उधाण”

पक्षप्रवेशावेळी भाजपचे शहराध्यक्ष भोसरीचे आमदार महेश लांडगे, विधान परिषद सदस्या उमा खापरे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, प्रदेश सचिव अमित गोरखे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस आणि पक्षाच्या युवा वॉरिअर्सचे प्रदेश संयोजक अनुप मोरे आदी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, ओव्हाळ हे राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांच्या पक्ष सोडण्याने त्या पक्षाला धक्का बसल्याचा दावा या प्रवेशानंतर भाजपकडून करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

देवेंद्र फडणवीसांच्या गाैफ्यस्फोटावर, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“पवारांना विचारुन सरकार स्थापन केलं असतं तर..”; काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

शरद पवारांविषयी बोलताना, आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली, म्हणाले…