आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. तर उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहून प्रत्युत्तर दिले आहे. त्यांच्या या पत्रावरुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
‘मुख्यमंत्री कार्यालयात काही अधिकारी किंवा सल्लागार अतिशय अपरिपक्व असल्यामुळे अशाप्रकराचं पत्र गेल्याचं माझा लक्षात येत आहे. मुख्यमंत्र्यांना सल्ला देईल, तो त्यांनी ऐकायचा असेल तर ऐकावा नाही तर ऐकू नये. अशाप्रकारचं पत्र पाठवतानात त्यांनीही खातरजमा केली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, आताही जे पत्र त्यांनी दिलं त्यात सांगितलं आहे की, मला 13 आमदारांचं डेलिगेशन भेटलं. त्यांनी शक्ती कायदा लवकर व्हावा अशा प्रकारची मागणी केली आहे. शक्ती कायदा लवकर बनवावा यासाठी दोन दिवसांचं अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आपण त्याचा विचार करावा. हा कुठलाही आदेश नाही, हा विचार व्यक्त केलाय. राज्यपालांना आदेश देण्याचा, फॉरवर्ड करण्याचा अधिकार आहे. त्यांनी तो फॉरवर्ड केलाय’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
संजय राऊत माझे मित्र, त्यांनी मानहानीची किंमत वाढवावी; चंद्रकांत पाटलांचा टोला
कितीही तोडफोड करा, मुंबई महापालिकेत भाजपला मोठे यश मिळणार- देवेंद्र फडणवीस
“सोमय्यांनी मुश्रीफांची चिंता वाढविली, पुन्हा कोल्हापूरला जाणार”
संजय राऊतांनी मेंदू निकामी झाल्यासारखे वक्तव्ये करू नये- अतुल भातखळकर