हे सरकार आपोआप कोसळेल; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

0
173

मुंबई ज्यात सरकार स्थापन करण्याची आमची कोणतीही इच्छा नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. हे सरकार कसेबसे चालले आहे. त्यामुळे हे सरकार कुणी पाडण्याची गरज नसून ते आपोआपच कोसळणार आहे, असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची कोणतीही मागणी करण्यात आली नसल्याचं सांगितलं आहे. तसंच भाजपाला सरकार स्थापन करण्याची कोणतीही इच्छा नसून, ही योग्य वेळ नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

दरम्यान, कोरोनापेक्षा भाजप हा मोठा शत्रू असल्याचं सरकारला वाटत आहे. भाजपा खासदार नारायण राणे यांना अन्याय सहन होत नसल्याने त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली असावी, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ जनतेची माफी मागावी- सचिन सावंत

महाराष्ट्र गद्दारांना माफ करत नाही; जितेंद्र आव्हाडांचा भाजपावर हल्लाबोल

लहान राज्यंही तुमच्याप्रमाणे जीएसटीसाठी रडत बसलेली नाहीत- देवेंद्र फडणवीस

मोदी चांगल्या मूडमध्ये नाहीत – डोनाल्ड ट्रम्प

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here