Home विदेश मोदी चांगल्या मूडमध्ये नाहीत – डोनाल्ड ट्रम्प

मोदी चांगल्या मूडमध्ये नाहीत – डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन : भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये एक मोठा वाद सुरू आहे. तसेच, काही दिवसांपासून भारत चीन सीमेवर तणाव पाहायला मिळत आहे. या परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला होता. पण भारताकडून तो प्रस्ताव नाकारण्यात आला. यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं वक्तव्य केलं.

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली आहे. चीनसोबत जे काही सुरू आहे त्यावरून त्यांचा मूड बिलकुल ठीक नाही, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर करतो. ते एक चांगले व्यक्ती आहेत. भारत आणि चीन या दोन्ही देशांची 1.4 अब्ज लोकसंख्या आहे. दोन्ही देशांचं लष्करही ताकदवान आहे. जर त्यांनी माझ्याकडे मदत मागितली तर मी नक्कीच मध्यस्थी करेन, असंही ट्रम्प म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

धक्कादायक! “कोरोना विषाणू घालवण्यासाठी पुजाऱ्यानं दिला नरबळी”

निवृत्तीनंतर शिखर धवन दिसू शकतो ‘या’ भूमिकेत

आता मुंबईत अमिताभ, शाहरुखऐवजी तुझ्या घरासमोर गर्दी होणार; सोनू सूद म्हणतो…

…या परिस्थितीतला केंद्र सरकारच जबाबदार-पृथ्वीराज चव्हाण