Home महाराष्ट्र चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ जनतेची माफी मागावी- सचिन सावंत

चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ जनतेची माफी मागावी- सचिन सावंत

मुंबई :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्यासाठी चालवण्यात येत असलेल्या रेल्वेच्या प्रवाशी भाड्यात 85 टक्के खर्च केंद्र सरकार करत असल्याचा दावा भाजपने केला होता. यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या कामगारांच्या प्रवास खर्चातील 85 टक्के हिस्सा केंद्र सरकार उचलत असून 15 टक्के राज्य सरकार करत असल्याचे खोटे विधान केले होते. चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ जनतेची माफी मागावी,” अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

दरम्यान, या प्रवाशांच्या तिकिटांचा सर्व खर्च हा राज्य सरकारांनीच केला असल्याचे केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले. यातून भाजपाचा खोटारडेपणा उघड झाला आहे, असं सचिन सावंत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्र गद्दारांना माफ करत नाही; जितेंद्र आव्हाडांचा भाजपावर हल्लाबोल

लहान राज्यंही तुमच्याप्रमाणे जीएसटीसाठी रडत बसलेली नाहीत- देवेंद्र फडणवीस

मोदी चांगल्या मूडमध्ये नाहीत – डोनाल्ड ट्रम्प

धक्कादायक! “कोरोना विषाणू घालवण्यासाठी पुजाऱ्यानं दिला नरबळी”