Home महाराष्ट्र ‘ते’ पंतप्रधानाच्या शर्यतीत, पण भाजपने…; सभागृहात जयंत पाटलांची टोलेबाजी

‘ते’ पंतप्रधानाच्या शर्यतीत, पण भाजपने…; सभागृहात जयंत पाटलांची टोलेबाजी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून सरकार स्थापन केलं. आणि शिंदे मुख्यमंत्री झाले आणि फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज विधीमंडळात जोरदार निशाणा साधला.

पंतप्रधानदाच्या शर्यतीत असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं. भाजपाने हा महाराष्ट्राच्या एका नेत्याचा अपमान केला आहे, असा टोला जयंत पाटलांनी यावेळी फडणवीसांना लगावला.

हे ही वाचा : पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं पुन्हा एक वादग्रस्त विधान, म्हणाले…

आमदार सुरत, गुवाहाटी असा प्रवास करून राज्यात परतले. या प्रवासानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे आम्हाला वाटत होते. माझी भारतीय जनता पक्षाबद्दल नाराजी आहे. देवेंद्र फडणवीस हे वाढणारे नेते आहेत. ते पुढच्या आठ दहा वर्षात ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असतील. मात्र त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. याच कारणामुळे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असणाऱ्या महाराष्ट्राच्या एका नेत्याचा अपमान भाजपाने केला आहे , असं जयंत पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

भाजपमध्ये तुमचा अपमान होतोय, तुम्ही आमच्याकडे या, मुख्यमंत्री करू; जयंत पाटलांनी शिंदेंना खुली ऑफर

“मनसेत जोरदार इनकमिंग; वंचित बहुजन आघाडीच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला मनसेत प्रवेश”

कालपर्यंत लाव रे तो व्हिडिओ म्हणणारा माणूस, आज अचानक…; शिवसेनेचा राज ठाकरेंवर हल्लाबोल