Home महाराष्ट्र “मनसेत जोरदार इनकमिंग; वंचित बहुजन आघाडीच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला मनसेत प्रवेश”

“मनसेत जोरदार इनकमिंग; वंचित बहुजन आघाडीच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला मनसेत प्रवेश”

मुंबई : आगामी निवडणूकीसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता मनसेनं वंचित बहुजन आघाडीला धक्का दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबई येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे झालेल्या मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार संघटनेचे अध्यक्ष, युवा सेनेचे जालना व हिंगोली चे माजी संपर्कप्रमुख, वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष प्राध्यापक श्री. शिवराज बांगर पाटील आणि शिवबा संघटनेचे मराठवाडा प्रमुख श्री. लक्ष्मण कदम पाटील यांनी पक्षात मोठ्या थाटात जाहीर पक्ष प्रवेश केला.

यावेळी मनसे नेते श्री. दिलीप धोत्रे, प्रदेश सरचिटणीस श्री. संतोष नागरगोजे, राज्य उपाध्यक्ष श्री. अशोक तावरे, उपाध्यक्ष श्री. सतनाम सिंग गुलाटी, महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा सौ. वर्षा जगदाळे, बीड जिल्हाध्यक्ष श्री. श्रीराम बादाडे, श्री. सुमंत धस, श्री. राजेंद्र मोटे, संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष श्री. सुमित खांबेकर, श्री. दिलीप बनकर, श्री. वैभव मिटकर, संभाजीनगर शहराध्यक्ष श्री. आशिष सुरडकर, श्री. गजानन गौडा पाटील इत्यादी पदाधिकारी यावेळी आवर्जून उपस्थित होते.
पक्ष प्रवेश केलेल्या सर्वांचे ‘मनसे’ अभिनंदन आणि पुढील राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!, असं मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

महाविकास आघाडी अजूनही घट्ट, तर मग महापालिका निवडणूका एकत्र लढणार का?; उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

“बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आता मला पुढे घेऊन जायचा आहे”

तुम्ही शिवसेनेतून कसे बाहेर पडलात?; राज ठाकरेंनी केला मोठा खुलासा, म्हणाले…